आपला चेहरा अगदी आकर्षक आणि बाहुल्यासारखा दिसावा या हट्टापायी रॉड्रीगो अॅल्वीस यानं जवळपास कोट्यवधी खर्च करून २० हून अधिक प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत. म्हणूनच आता सगळेच त्याला ‘ह्युमन केन डॉल’ म्हणून ओळखू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी तो भारतभ्रमंतीसाठी देखील आला होता. पासपोर्टवरच्या फोटोशी चेहरा मिळता जुळता नसल्याचं लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी रॉड्रीगोला दुबई विमानतळावर अडवण्यात आलं होतं. तेव्हापासून रॉड्रीगो हा चर्चेत आहे. रॉड्रीगो 34 वर्षांचा आहे आणि वयाच्या 19 वर्षांपासून तो बाहुल्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत त्याने शस्त्रक्रियेसाठी आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं समजतं.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
